बीड येथे झालेल्या ओबीसी समाजाच्या ’महाएल्गार’ सभेनंतर ओबीसी नेत्यांमध्ये मोठी फूट पडल्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी ओबीसी नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
बीडच्या सभेत छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा एक व्हिडिओ सार्वजनिकरित्या दाखवला होता. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी वडेट्टीवारांनी समर्थन दर्शविल्याचे या व्हिडिओतून दाखवून भुजबळांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावर आता तायवाडे यांनी भुजबळांवर टीका केली आहे.
तायवाडे यांचा पलटवार

